मांजर आणि प्रॉब्लेम सॉल्विंगची विचारी पद्धत
काळं-हिरवं मांजर चिडचिडलं होतं. आख्खं घर पालथं घालून झालं तरी त्याला त्याचं झोपायचं खोकं सापडलं नव्हतं आणि त्यात भरीस भर म्हाणजे त्याला आता खूप झोपही यायला लागली होती. मांजराचा मुळातला प्लॅन तसा साधाच होता, नेहमीच्या ठिकाणी जाऊन खोक्यात ताणून देणे! पण आजचा दिवस वेगळा होता, खोकं नेहमीच्या जागी नव्हतंच. आधी मांजराचा विश्वास बसेना पण मग घटनेचं गांभीर्य ओळखून त्यानी आजु-बाजूची ठिकाणं धुंडाळायला सुरुवात केली. मग इतर खोल्या शोधल्या आणि शेवटी बागेतही जेव्हा खोकं सापडलं नाही तेव्हा मांजर हताश झालं, झोपही दाटून आल्यामुळे त्याच्या नकळतच त्याची पावलं नेहमीच्या ठिकाणी वळली. खोकं अर्थातच नव्हतं.
बेबलॉश्की मांजराची सगळी धावपळ पाहत होता. त्याला खरंतर कळतच नव्हतं की मांजराला काय हवंय ते, पण जेव्हा मांजर भटकून परत आलं तेव्हा बेबलॉश्कीला उमगलं की मांजराला झोप आली आहे. मग बेबलॉश्कीने मांजराला उचलून घेतलं, त्याला लाडाने कुरवाळलं, मांजराला हे attention खूप छान वाटलं पण त्याच वेळी एक नवाच विजेसारखा विचार त्याच्या मनात लखलखला "... कदाचित खोकं हरवण्याच्या मागे बेबलॉश्कीच असावा, पण बेबलॉश्कीला त्यातून काय साद्ध्य होणार आहे? पण बेबलॉश्कीच्या बऱ्याच गोष्टींना तसा अर्थ नसतोच बरेचदा, तसंच असावं हे..." मांजराचे विचार चालू असतानाच बेबलॉश्कीने त्याला छानपैकी जुन्या खोक्याच्या जागी ठेवलेल्या नवीन बास्केट मधल्या मऊ गादीवर झोपवलं..
6 comments:
Superb observation ! unusual as usual !!
aprateem....as usual
मस्त! बेबलोष्की आणि काळ्या-हिरव्या मांजराला परत भेटून आनंद झाला. चित्रही झकास!
Gayatri, Koham and Raj,
Thanks a lot for the feedback!
vah chhan tumach blog ani site donhi vachale, purn nahi pan thod vachal.. kahitari agala vegal chhan. tumachi chitra far avadali.
Thanks Satyajit!
Post a Comment