त्याच्या चौकटीतला लयदार प्रदेश

बेबलॉश्कीच्या कपड्यांचा पसारा भलतीकडेच पसरला होता तर काळ्या-हिरव्या मांजराचं झोपण्याचं खोकं उलटीकडे पडलं होतं. खिडकीबाहेरच्या गुलमोहोराची पानं वाऱ्याने हलत होती आणि बेबलॉश्कीचं इकडून तिकडे आणि तिकडून इकडे असं अधुन-मधून चालंलं होतं.आरशातल्या चौकटीतून काळं-हिरवं मांजर या सगळ्या गोष्टी आणि हालचालींकडे पाहत बसलं होतं. का कोणास ठाऊक काही वेळानी त्याला चौकटीत एक विचित्र लय जाणवू लागली. पुस्तकांचे ढिगारे तलम सुळसुळीत हो ऊन खुर्चीच्या हातावर पडले आणि झोपण्याच्या खोक्याचं सरळ रेषांचं त्रिमितीय रूप तर फारच आकर्षक भासू लागलं. आणि बेबलॉश्की तर अजिबातच कंटाळवाणा वाटत नव्हता... त्याचं वावरणं झोक्यांच्या लयीत घडत असल्यासारखं वाटत होतं. अचानक बेबलॉश्की मोठा मोठा मोठा हो ऊ लागला आणि मांजराला वाटू लागलं तो आता चौकटीतून बाहेरच येणार आहे, तोच बेबलॉश्कीच्या हातात मांजराला स्वत:चं काळं-हिरवं रुपडं दिसू लागलं. मग मांजराला झोक्यांच्या लयीमुळे किंचित भोवळल्यासारखं झालं.

4 comments:

Raj said...

मस्त! खरे तर दर वेळी तीच प्रतिक्रिया द्यायच्या ऐवजी काहीतरी नवीन शोधायला हवे.. दर वेळी पोस्ट मस्तच असते. :-)
काळ्या हिरव्या मांजराचे चित्रही झकास!

कोहम said...

masta.....zakaas....sundar

hemant_surat said...

बेबलॉश्की हा आता फ़क्तं निवेदिताचा नाही राहीला. तो आता आम्हा वाचकांचा पण जवळचा आहे. जर आपले कोणी लाड केलेत तर आपल्यालाही त्या हिरव्या-पिवळ्या मांजरासारखे छान छान वाटू लागेल.

Nivedita Barve said...

राज, कोहम आणि हेमंत,
प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद!