त्याच्या प्रतिभेचे धुमारे अर्थात बेबलॉश्की लिहायला बसतो तेव्हा..

कित्येक दिवस खूप साहित्यिकांच्या खूप थोर कलाकृती वाचून झाल्यावर बेबलॉश्कीला वाटले आपणही काहीतरी लिहावे. त्याने एक नवी कोरी रेघारेघांची वही आणली आणि एका नव्या कोऱ्या काळ्या पेनाने लिहायचे ठरवले. पण आता काय लिहावे हा प्रश्न निर्माण झाला. मग डोक्यात जो पहिला विचार आला त्यावर त्याने लिहायला सुरुवात केली तर त्याला दोन ओळींतच लक्षात आलं की एका साहित्यिकाने त्यावर आठ खंड आधीच लिहून ठेवले आहेत. मग दुसऱ्या नंबरच्या विचारावरचा त्याला हायकू संग्रह आठवला. तिसऱ्या आणि चौथ्या विषयाचीही अशीच अनुक्रमे एका ब्लॉग आणि दिर्घांकामध्ये वासलात लागल्यावर बेबलॉश्कीला एकदम कोंडीत सापडल्यासारखं वाटू लागलं. त्यात त्याला वहीची पानंही उष्टी झाल्यासारखी वाटू लागली. तो मग भयंकर अस्वस्थ झाला आणि त्यानं पटकन वहीची लिहिलेली पानं फाडून टाकली.
वही spiral binding ची असल्यामुळे पुन्हा नवी कोरी दिसू लागली. त्या शुभ्र पानांकडे बघता बघताच बेबलॉश्कीच्या मनात विचार आला "या कोऱ्या पानासारखाच माझा हा प्रयत्न नवा कोरा आहे, कदाचित आधी कोणी कोणी महान लोकांनी सर्व विचारांवर लिहून ठेवलेलं असेलही, पण माझे विचार तर माझ्या आयुष्यावरचेच तर आहेत ना!! कदाचित माझं लेखन कोणाला खूप थोर वाटणारही नाही पण माझ्या आयुष्यावरचे माझे विचार तर फक्त मीच लिहू शकतो!!" बेबलॉश्कीला आता डोक्यातल्या सर्वच्या सर्व गोष्टी लिहून काढायची तीव्र निकड भासू लागली.
मग सुरुवातीच्या आखीव-रेखीव हस्ताक्षराचं अखर-वखर शब्दांत रुपांतर होईपर्यंत तो लिहितच राहिला.

9 comments:

Anonymous said...

ten thousand poets
have viewed ten thousand moons.
this moon, just one.

(don't remember where did i read this haiku now...)

Raj said...

सुंदर. तुमच्या टिंबकथांमध्ये नेमके काय विशेष आहे ते सांगता येत नाही. पण बेबलॉश्की फारच आवडलाय. आणि हो, काळ्या-हिरव्या मा़ंजराला परत आणा, प्लीज! :-)

कोहम said...

निवेदिता, तुझ्या हया टिंबकथा हल्ली भारीच आवडिच्या झाल्यात. आजच्या कथेत तर मलाच बेबलॉश्की असल्यासारखं वाटलं. खरंच रिडिस्कव्हरी तितकीच आनंददायी असू शकेल, डिस्कव्हरी इतकीच. आणि डिस्कव्हरी एकदाच होते. रिडिस्कव्हरीला काही अंत नाही. प्रत्येकाने आपला चस्मा लावावा आणि एकच गोष्ट, वेगळी वेगळी अनुभवावी. नुसतीच अनुभवू नये, तर तो अनुभव दुसऱ्यांनाही सांगावा. सांग तुझ्या बेबलॉश्कीला. एकदम मस्त!

Nivedita Barve said...

anonymous,
beautiful haiku! haikus have such a nice way to get to the point!

राज,
इतका छान फीडबॅक दिल्याबद्दल धन्यवाद! काळं-हिरवं मांजर नक्की परत येईल :)

कोहम,
रीडिस्कवरी बद्दल खूपच सुंदर लिहिलं आहेस. आयुष्य जगताना स्वत:च्या दृष्टीकोनातून गोष्टींकडे बघण्याची लिबर्टी आपण नक्कीच घेऊ शकतो... आणि रीवॉर्ड म्हणून कधी कधी एखादी डिस्कवरी ही हाती लागते!

Raj said...

Nivedita,
This above comment by nenos is spam and clicking the link probably leads to virus or trojan. Please delete it so that nobody clicks it accidentally.

Nivedita Barve said...

Thanks for pointing out Raj.
The spam problem is popping up everywhere these days...looks like spammers are getting really very creative!

तुमचा आनंद said...

Simple and pointing short stories...
Te mhantat na मर्मिक लिखाण.. asa kahi sa.. Agadi tasa..

keep it up.. RSS feed karun thevalay.. navin yet rahil aamachya topalit.. ;-)

Nivedita Barve said...

Thanks Anand :)

HAREKRISHNAJI said...

Terrific stories.