झोप
सकाळचे साडेआठ वाजले होते आणि छोटा पिकू गाढ झोपेत होता. पिकूची आई त्याला उठवायला आली "पिकू उठ रे बाळा, सूर्य केवढा वर आलाय बघ!" पिकू ढिम्म हलला नाही कारण त्याला काही ऐकूच गेलं नाही. तेवढ्यात पिकूचे बाबा म्हणाले, "झोपू दे गं त्याला, थंडीचे दिवस आहेत..आणि आज नाहीतरी सुट्टीच आहे त्याला." आईला असं बेशिस्त वागणं आवडलं नाही पण ती काही म्हणाली नाही.
मग असेच जेव्हा दहा वाजले आणि तरीही पिकू उठायचं नाव काढेना तेव्हा बाबांनीच त्याला बळंबळं उठवलं. पिकू कष्टानेच उठला, त्याला हे सगळं प्रकरण बिलकूलच आवडलं नाही. त्याला खरंतर अजून खूप झोपायचं होतं. त्याला बाईंनी शाळेत शिकवलेल्या काय काय गोष्टी आठवू लागल्या की खारूताईंसारखे प्राणी थंडीचे सर्व दिवस झोपून काढतात... पिकूनी मग जोरात भोकाड पसरलं.
2 comments:
Hi Nivedita, aattaparyant sagaleech post vachat hoto, pan comment prathamach lihito aahe. Blog aavadala, Mazi bad-bad sarakhach vegala aani surekh aahe.
Thanks a lot Nandan. I am glad that you read the blog and like it. Its certainly encouraging for me :)
Post a Comment