सादर आहे काळं-हिरवं मांजर!
"बेबलॉश्कींची उत्क्रांती झाली असेल काय? कदाचित डोळ्यांना दिसणारा बदल नसेल हा, पेशींच्या पातळीवरचा बदल असेल..मेंदूच्या पेशींमधला. पण मग हे आधीच कोणाच्या लक्षात कसं नाही आलं? किंवा हा इतका अलिकडचा बदल आहे की मलाच हा शोध पहिल्यांदा लागतोय!?" काळ्या-हिरव्या रंगाचं, पांढऱ्या तोंडाचं मांजर या विचारांनी अगदी हरखून गेलं.
झालं होतं असं, की जागा झाल्यावर बेबलॉश्कीनं विचारमग्नपणे दोन क्षण मांजराकडे पाहिलं होतं आणि सरळ त्याचं मानगुट पकडून तो दुधाच्या पातेल्याकडे निघुन गेला होता.
"नक्कीच बेबलॉश्कींना आता मनातले विचार ओळखता येऊ लागले आहेत!" मांजर निष्कर्श काढुन मोकळं झालं.