मांजराचे कोळ्याविषयीचे प्रगल्भ विचारमंथन
काहीतरी घडलं आणि काळ्या-हिरव्या मांजराला जाग आली. त्याने डोळे उघडले तर त्याला एक मोठा काळा टपोरा कोळी तुरू तुरू झाडीत जाताना दिसला. तो खाऊन टाकायला हवा होता की कसं असा विचार करत असतानाच, बेबलॉश्कीच्या चुळबुळीमुळे ते भानावर आलं. काहीशा रागानं त्यानं बेबलॉश्कीकडे पाहिलं तर बेबलॉश्की खुळ्यागत आपल्या बोटांकडे बघत बसलेला दिसला. मांजर विचार करू लागलं, "बेबलॉश्कीला स्वत:च्या बोटांकडे बघून काय नविन ज्ञान मिळणार आहे? त्यानी जर माझ्या बोटांकडे पाहिलं तर त्याला मांजरांच्या पायाची ठेवण किंवा नखे किती स्वच्छ ठेवावीत असं काहीतरी समजु शकेल. किंवा त्यानी समजा त्या कोळ्याचे पाय निरखून पाहिले तर ते चविष्ट असू शकतात हे त्याला कळू शकेल किंवा खरंतर बेबलॉश्कीची बोटं खुपशी कोळ्याच्या पायांसारखीच दिसतात हे ही त्याला कदाचित लक्षात येईल..." अनेक विचार एकदमच करुन पाहिल्यामुळे मांजर थकाटले आणि त्याला अचनाक झोप दाटून आली.
7 comments:
तुमची अनुदिनी आत्ता पहिल्यांदाच पाहिली. सर्व कथा मस्त आहेत. विशेष म्हणजे नेहेमी पेक्षा अगदी वेगळ्या आहेत. मला यातली नावे आणि काही वाक्येही खूप आवडली, बेबलॊश्की किंवा मांजर थकाटले :) पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
मला जे काही लिहायचे होते ते राज नी आधीच लिहीले आहे.
हे वचताना रशियन अनुवादीक कथा वाचत आहोत असा आभास होतो.
राज आणि हरेक्रिष्णजी,
तुमच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. या कथा तुम्हाला आवडल्या आणि कथांमधला germ तुमच्यापर्यंत पोचला याचा मनापासून आनंद होतो आहे. मला पुढचे posts लिहिण्यासाठी ही एक मोठी encouragement आहे!
हाय! तुमचा कॅन्व्हास पाहिला. खुप छान पेंटींग्स आहेत. तिथे प्रतिक्रिया द्यायच्या होत्या. पण देता आल्या नाहीत म्हणून येथे देत आहे. तुमच्या कथा पण वाचल्या. स्पेशली बेबलॉश्की आवडलं! :-)
thanks sonal :)
what next ?
harekrishnaji,
i am planning post a new one in next few days, in the vacation time :)
Post a Comment