बेबलॉश्कीचे हात आणि कोळ्याचे पाय

त्या दिवशी बेबलॉश्की मस्त मजेत झाडाखाली तंगड्या पसरून बसला होता. छान गार वाऱ्याच्या झुळुका अंगावर घेत. शेजारी त्याचं मांजर दुपारची डुलकी काढत होतं. बेबलॉश्कीचाही डोळा लागतंच होता. अचानक त्याला पायावर काही हालचाल जाणवली. अर्धवट झोपेत त्याने पाहिले तर पायावर एक मोठा कोळी छान पहुडला होता. दचकून बेबलॉश्कीने पाय झटकला. या हालचालींनी मांजर जागं झालं आणी कोळी तुरुतुरु पळत शेजारच्या झाडीत गायब झाला. बेबलॉश्कीला कससंच वाटू लागलं. तो आत गेला आणी पाय खसाखसा साबणाने धुवुन बाहेर येऊन बसला. पण आता त्याला अस्वस्थंच वाटत राहिलं. त्याला सारखे कोळ्याचे भयानक विद्रुप पाय आपल्या हाता-पायावरुन चालतायंत असं वाटू लागलं.
इतक्या वेळात मांजर जागचं ढिम्म हललं नव्हतं पण बेबलॉश्कीला उगाचंच वाटलं की मांजर त्याच्या हाता-पायांकडे विचित्र पाहतंय. बेबलॉश्की मग अजुनच अस्वस्थ होत स्वत:च्या दहा बोटांकडे बघत राहिला.

3 comments:

HAREKRISHNAJI said...

आपला बॉग खुपच मस्त आहे. आवडला. Layout तर झक्कस. रंगसंगती सुरेख.

Nivedita Barve said...

thank you harekrishnaji!

Rameshwar Sabde said...

माण्साचा भुत्काळ हा कोळ्यासारखा अस्तो असेच ना?