अशा एका संध्याकाळी
संध्याकाळची वेळ होती. मेट्रो चा डबा लोकांनी भरून गेला होता. ऑफिसेसचे आणि फॅक्टरी मधले लोक घरी निघाले होते. दिवसभराचा शीण आणि दमणुक यांनी तो डबाही व्यापून गेला होता.
दरवाजा बंद व्हायच्या काही सेकंद आधी हुआन डब्यात शिरला. तोही कंपनीत दिवसभर राबून घरी निघला होता. हुआनची पॉलिसी होती, ऑफिस सोडलं की कामाच्या गोष्टींचा विचार करायचा नाही. पण त्याचे विचार दिवसभरात घडलेल्या गोष्टींकडे धावत होते. मग त्यानी डब्यात इकडे तिकडे पहायला सुरुवात केली. एका कोपऱ्यातले काका जोरजोरात शेजाऱ्याशी वाद घालत होते. डब्ब्यात शिरलेल्या एका अज्जीबाईंनी एका मुलीला उठवून तिची सीट पटकावली होती. एक, माणसांचा घोळका कोंडाळं करून काहितरी चर्चा करत होता. एक काकूबाई मासिकं विकत फिरत होत्या. एक मुलगा आणि मुलगी प्रेमाच्या गप्पा करत बाजूला उभे होते. त्यांचं आजू-बाजूला लक्षंच न्हवतं, आणि म्हणूनच कदाचित बाकी लोकांना त्यांच्याकडे बघण्याचा मोह होत होता.
हुआनला त्यांच्याकडे बघुन बायकोची आठवण आली. ती एका छोट्या स्टोअर मधे काम करायची. ती घरी आल्यावर स्वयंपाक करून हुआनची वाट पहात बसायची. तो विचारात पडला, कदाचित तिला खूपच जास्त काम पडतंय हल्ली. गेले काही दिवस हुआन च्या कामाचा व्याप वाढल्यामुळे त्याला तिचा विचार करायला वेळच मिळाला नव्हता. त्याला मग थोडं गिल्टीचं वाटलं, त्याला आठवेचना त्यानी तिच्याबरोबर शेवटच्या पोटभर गप्पा कधी मारल्या होत्या ते. अस्वस्थ होत त्यानी आजूबाजूच्या लोकांवर नजर फिरवली, दाराशी उभी असलेली तरुण मुलगी स्वप्नाळुपणे बाहेर बघत होती, कोंडाळ्यातला एक माणुस शून्यात बघत होता, मासिकं विकणाऱ्या काकुंचा चेहेरा त्याला उगाचंच उदास भासला. हुआनला अचानक घरी पोचायची घाई झाली.
स्टेशनवर उतरल्या-उतरल्या आधी त्यानं एक लाल फुलांचा गुच्छ घेतला.
3 comments:
खुपच छान... साधं सरळ तरी सुद्धा आपल्यासोबतच झाल्यासारखा वाटणारा अनुभव... very true and real life... keep up the good work
mast!
he ekhaadyaa jpani katheche bhashatar aahe kaa?
chhan lihilaye! var comments madhye mhatalya pramane kharokhar he saare lekh ekhadya japanese kadambari / kathasamgrahache anuvaad vaTatat. :-)
keep writing..
Post a Comment